Aadhaar Card Deadline 2025

Aadhaar Card Deadline 2025: विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची तपासणी होणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांपैकी आठ लाखांचे आधार कार्ड अवैध ठरण्याची शक्यता आहे. आधार कार्ड अवैध ठरल्याने पाच टक्के विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची दखल घेणे आवश्यक आहे.
शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढे याबद्दल सर्व माहिती पुढे दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या इतर मित्रांनाही कळवा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी लगेच आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!
आधार कार्ड अपडेट शेवटची तारीख
आता राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची वैधता तपासण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील दोन कोटी दोन लाख विद्यार्थ्यांपैकी चार लाख 23 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तीन लाख 95,800 विद्यार्थ्यांची आधार कार्ड जमाच नसल्याने वर्गात उपस्थित राहणाऱ्या पण आधार कार्डाविना ‘निराधार’ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आठ लाखांच्या आसपास पोहोचणार आहे.
राज्यातील एकूण विद्यार्थीसंख्येपैकी पाच टक्के विद्यार्थी ‘शालाबाह्य’ ठरण्याची शक्यता आहे. यंदापासून शाळांना सरल पोर्टल (SARAL Portal Maharashtra gov) आणि यूडायस पोर्टल ( UDISE portal Student profile ) या दोन वेगवेगळ्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे सक्तीचे नाही. त्याऐवजी यूडायस प्लस याच पोर्टलवर ही माहिती भरता येणार आहे.
30 सप्टेंबरपर्यंत पटावर नोंद झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार कार्ड वैध असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊनच संचमान्यता करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार वैध झालेले विद्यार्थी अवैधच ठरणार आहेत. त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या. Aadhaar Card Deadline 2025
आधार कार्ड अपडेट कसे करायचे

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊ शकता. पत्ता आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशील जसे की नाव, जन्मतारीख आणि लिंग अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल, परंतु पत्ता किंवा बायोमेट्रिक तपशील ऑनलाइन अपडेट करता येतात.
या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला असून हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील तब्बल आठ लाख शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात सध्या दोन कोटी दोन लाख तीन हजार २७१ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी चार लाख 23 हजार 408 विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरली आहेत.
त्याशिवाय तीन लाख 95 हजार 800 विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नसल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक, म्हणजे 43468 विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातून अवैध ठरले आहेत. आणि त्यासोबतच मुंबई शहर व उपनगरांमधून 41,647 पुणे जिल्ह्यातील 32,440 नाशिक जिल्ह्यातील 22,567 विद्यार्थी अवैध ठरले आहेत. राज्यातील एकूण पाच टक्के विद्यार्थी या निर्णयामुळे शाळाबाह्य होणार आहेत. Aadhaar Card Deadline 2025
- 4 लाख 23 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध नाहीये.
- 3 लाख 95,800 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जमाच नाही.
- आधार वैधता तपासण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत.
आपला टेलेग्राम चॅनल | Telegram Channel |
आधार अपडेट अधिकृत वेबसाइट | Official Website |
इतर अपडेट | Other Important Update |
Aadhaar Card Deadline 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या अपडेट बद्दल थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी Naukrimarg.com रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :
धन्यवाद!