Airtel Scholarship 2025 Information In Marathi
Airtel Scholarship 2025: मित्रांनो भारती एअरटेल फाऊंडेशनने 2024 मध्ये एक भव्य शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती, जी आता 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी पण सुरू करण्यात आली आहे. Airtel Scholarship 2025 या योजने मध्ये तब्बल 100 कोटींच्या निधीतून जे गरीब आणि गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
जर तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर स्कॉलरशिप बद्दलची सर्व माहिती जसे की आवश्यक पात्रता, अर्ज पद्धती व इतर माहिती पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. तसेच देशातील व राज्यातील अशाच महत्त्वाच्या स्कॉलरशिप योजनांची माहिती योग्य वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा.
एअरटेल स्कॉलरशिप 2025-26
या योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे वंचित पार्श्वभूमीतील विदयार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध करून देणे” कारण कित्येक विद्यार्थी असे असतात ज्यांना पैशाच्या अडचणीमुळे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत नाही. या Scholarship मध्ये विशेष म्हणजे, या योजनेत मुलींना प्राधान्य देण्यात येत असून, विद्यार्थ्यांना 100% फी माफी, हॉस्टेल आणि जेवणाच्या खर्चाची पूर्तता कंपनी द्वारे केली जाणार आहे. तसेच, प्रथम वर्षात लॅपटॉप देखील मोफत दिला जाणार आहे.
हेही पहा :
भारती एअरटेल टेक्नॉलॉजी शिष्यवृत्ती योजना 2025
स्कॉलरशिप योजनेत मिळणारा लाभ : या Scholarship मध्ये पुढील लाभ मिळणार आहे.
वार्षिक फी | 100% फी शिष्यवृत्तीतून भरली जाईल (युनिव्हर्सिटी स्ट्रक्चरप्रमाणे) |
हॉस्टेल व मेस शुल्क | पूर्णतः भरली जाईल (जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीच्या दरानुसार) |
लॅपटॉप | पहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटॉप दिला जाईल |
Scholarship Time | UG व 5 वर्षांचे इंटिग्रेटेड कोर्सेस – पूर्ण कालावधीसाठी |
फिनिशिंग कमिटमेंट | शिक्षण पूर्ण झाल्यावर एक विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. |
Airtel Scholarship 2025 (पात्रता)
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
- 2025-26 साठी अभियांत्रिकी / किंवा 5 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स प्रवेश निश्चित असावा
- कोर्सेस: Electronics & Communication, Telecom, IT, CS, Data Science, Aerospace, AI, ML, Robotics, AR/VR, IoT
- NIRF 2024 मध्ये टॉप 50 अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश घेतलेला असावा
- कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8.5 लाखांपेक्षा कमी असावे
- यामध्ये मुली, दिव्यांग, एक पालक/ पालक नसलेले अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- कोणतीही दुसरी शिष्यवृत्ती (same purpose साठी) घेतलेली नसावी
Airtel Scholarship 2025 Required Document
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
- चालू वर्षाचा प्रवेश (प्रवेश पत्र, विद्यापीठ/संस्थेचे शुल्क पत्र)
- बारावीची गुणपत्रिका
- जेईई स्कोअरकार्ड किंवा विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा स्कोअरकार्ड
- पालक/पालकांच्या उत्पन्नाची कागदपत्रे:
- जर पगारदार असेल तर – नवीन आयकर रिटर्न फॉर्म आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
- जर करपात्र उत्पन्न नसेल तर – सरकारने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
- अर्जदाराचे आणि पालकांचे गेल्या ६ महिन्यांचे बँक खाते तपशील (जसे की खाते क्रमांक, आयएफएससी, शाखेचा पत्ता)
- संस्थेचे बँक खाते तपशील
- अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
- अर्जदाराकडून उद्देशाचे विधान (SOP)
इत्यादी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तरच तुम्ही या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकता.
Airtel Scholarship 2025 Selection Process
निवड प्रक्रिया : या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड पुढील पद्धतीने केली जाते.
सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्यानंतर, भारती एअरटेल फाउंडेशन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची विविध टप्यांमध्ये निवड करते.
- शैक्षणिक गुणवत्ता.
- आर्थिक गरज आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी
या गोष्टींचा महत्वाने विचार केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘भारती स्कॉलर्स’ (Bharti Scholars) अशी ओळख दिली जाते. स्कॉलरशिप योजना भरती एरटेल ने गेल्या वर्षापासूनच सुरू केली होती. त्यामध्ये एकूण 276 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि यामध्ये 22% म्हणजेच 62 मुली विद्यार्थिनी पात्र ठरल्या.
महत्वाचे :
- JOSAA फी, लायब्ररी डिपॉझिट, इंटरनेट फी, नुकसान भरपाई इ. छोट्या खर्चांसाठी शिष्यवृत्तीत कव्हर नसतो – ते विद्यार्थ्यांनाच भरावे लागतील.
- जर Airtel Scholarship 2025 साठी कोणतीही चुकीची माहिती पुरवली गेली असेल, तर शिष्यवृत्ती रद्द केली जाईल आणि सर्व रक्कम परत मागवली जाईल. त्यामुळे माहिती देताना सर्व बरोबर माहिती द्या.
- दिलेला लॅपटॉप हरवला किंवा खराब झाला, तर त्याची जबाबदारी विद्यार्थ्याचीच असेल.
How to Apply for Airtel Scholarship 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : एअरटेल शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी ते अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. (Bharti Airtel Foundation) वर अर्ज सादर करून अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करणे आवश्यक असेल.
💻 आपला टेलेग्राम चॅनल जॉइन करा | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :