CAPF Exam Preparation In Marathi

मित्रांनो तुमचेही स्वप्न आहे का देशाची सेवा करण्याच. तर आता आपण या लेखामध्येCAPF Exam Preparation In Marathi ही माहिती पाहणार आहोत. तर UPSC CAPF Assistant Commandant ही परीक्षा तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. फक्त एक सरकारी नोकरी नव्हे, तर ही आहे कर्तव्य, साहस आणि देशसेवेची वाटचाल. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून “वर्दीतला अभिमान” मिळवण्यासाठी स्पर्धा करतात.
पण यश त्यांनाच मिळतं, जे योग्य मार्गदर्शनासोबत स्मार्ट आणि सातत्यपूर्ण मेहनत करतात. तर तुम्ही कशाप्रकारे CAPF Exam ची तयारी कशा पद्धतीने करू शकता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात. याची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
Step-by-Step Guide for CAPF Exam Preparation
What is CAPF: तर सर्वात आधी आपण CAPF काय आहे याची माहिती पाहणार आहोत. सशस्त्र सुरक्षा बल (Central Armed Police Forces – CAPF) ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधीन असलेली पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. यामध्ये BSF (Border Security Force), CRPF (Central Reserve Police Force), CISF (Central Industrial Security Force), ITBP (Indo-Tibetan Border Police), SSB (Sashastra Seema Bal) अशा विविध घटकांचा समावेश होतो.
या बलांमध्ये असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) पदासाठी दरवर्षी UPSC (Union Public Service Commission) मार्फत परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सामान्यतः “CAPF AC Exam” असे म्हटले जाते.
CAPF AC Eligibility
CAPF Exam Preparation: CAPF AC परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी खालील अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे|
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
- वयाची अट: वयोमर्यादा ही 20 ते 25 वर्षं आहे (SC/ST/OBC वर्गासाठी सवलत आहे).
- राष्ट्रीयत्व: उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- शारीरिक क्षमता: विशिष्ट उंची, वजन व फिटनेस स्टँडर्ड्स पूर्ण करावे लागतात.
CAPF Selection Process
निवड प्रक्रिया : सशस्त्र सुरक्षा बल मध्ये निवड प्रक्रिया पुढील टप्प्याद्वारे करण्यात येते.
लेखी परीक्षा (Written Examination)
- Paper I: General Ability and Intelligence (Objective Type – 250 Marks)
- Paper II: General Studies, Essay, and Comprehension (Descriptive – 200 Marks)
शारीरिक क्षमता चाचणी (PET – Physical Efficiency Test)
- 100 मीटर धाव, 800 मीटर धाव, उंच उडी, दीर्घ उडी
व्यक्तिमत्व चाचणी (Interview/Personality Test)
- 150 गुणांची मुलाखत UPSC तर्फे घेतली जाते.
ही अपडेट पहा :
CAPF Exam Study Strategy
अभ्यास कसा करावा? :
हा कोणत्याही परीक्षेची तयारी (CAPF Exam Preparation) करत असताना खूप महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे अभ्यास कसा करावा? तर सर्वप्रथम सिलेबस व्यवस्थित समजून घ्या. UPSC चा सिलेबस अत्यंत स्पष्टपणे दिलेला असतो. Paper I मध्ये General Mental Ability, Current Events, Indian Polity, History, Geography, आणि General Science यांचा समावेश असतो. Paper II मध्ये निबंध लेखन, इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन, रिपोर्ट राइटिंग यावर भर दिला जातो.
पुस्तकांची निवड योग्य ठेवा : पुढे काही महत्वाच्या पुस्तकांची यादी दिली आहे.
- General Studies: NCERT (6 वी ते 12 वी), Lucent General Knowledge
- Indian Polity: Laxmikant’s Indian Polity
- History: Spectrum’s Modern India
- Geography: NCERT + GC Leong
- Current Affairs: The Hindu / Indian Express Newspaper, Yojana Magazine, PIB
- Essay & Comprehension: Arihant Publications किंवा UPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका
दैनिक अभ्यासाचे वेळापत्रक ठरवा : आता तुम्ही योग्य पुस्तके निवडल्यानंतर दैनिक अभ्यासाचे वेळापत्रक ठरवणे तितकेच महत्वाचे आहे. दररोज कमीत कमी 6-8 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि पुढे दिल्याप्रमाणे वेळापत्रक ठरवा:
- सकाळी – General Studies + Current Affairs
- दुपारी – Subject-specific topics (Polity/History)
- संध्याकाळी – Revision + Test solving
- रात्री – Essay Writing किंवा Comprehension Practice
नोट्स तयार करा :
अभ्यास करताना या सर्व विषयांचे मुद्देसूद व संक्षिप्त नोट्स तयार करा. यामुळे शेवटच्या क्षणी रिव्हिजन सोपे जाते. नोट्स हँडरायटिंगने तयार केल्यास लक्षात ठेवणे अधिक सोपे जाते. नकाशा, डायग्राम व फॅक्ट्स यांचा उपयोग करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे नोट्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. CAPF Exam Preparation
चालू घडामोडी (Current Affairs) वर विशेष लक्ष

अभ्यासक्रमामद्धे चालू घडामोडी वर भर देणे गरजेचे आहे. कारण CAPF Paper I मध्ये चालू घडामोडीवर मोठा भर असतो. म्हणून दररोज एक चांगले इंग्रजी वृत्तपत्र वाचा आणि महत्वाच्या चालू घडामोडी च्या नोट्स तयार करा. तसेच Yojana आणि Kurukshetra मासिकेही उपयुक्त ठरतात. महिन्याच्या शेवटी एक रिव्हिजन करा.
Test Series आणि Mock Tests :
- दर आठवड्याला एक Mock Test सोडवा.
- UPSC Previous Year Papers चा सराव करा.
- Time Management चा सराव खूप गरजेचा आहे.
- Test Seriesमुळे आपली तयारी कुठे आहे हे लक्षात येते.
शारीरिक तयारी (Physical Fitness) : परीक्षेच्या सोबतच शारीरिक तयारी असणे देखील खूप महत्वाचे आहे.
लेखी परीक्षेनंतर शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते. म्हणूनच तुम्ही दररोज सकाळी धावण्याचा, उडी मारण्याचा व व्यायामाचा सराव केला पाहिजे. तुम्ही उत्तीर्ण झालात तरी PET मध्ये फेल झालात तर तुमचा पुढचा प्रवास थांबतो.
- 100 मीटर धाव – 16 सेकंदांत
- 800 मीटर धाव – 3 मिनिट 45 सेकंदांत
- Long Jump – 3.5 मीटर (3 वेळा प्रयत्न)
- High Jump – 1.05 मीटर (3 वेळा प्रयत्न)
ही अपडेट पहा :
Shivaji University Bharti 2025: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये नवीन भरती!
मुलाखतीची तयारी (CAPF Interview Preparation)
CAPF Exam Preparation मध्ये मुलाखत ही अंतिम पण अत्यंत महत्त्वाची टप्पा आहे. यात तुमच्या ज्ञानासोबतच Communication Skill, Personality, आणि Attitude बघितले जातात. खालील बाबींचा सराव करा:
- Mock Interviews द्या.
- स्वतःची माहिती (DAF) व्यवस्थित तयार करा.
- चालू घडामोडी व राष्ट्रीय मुद्द्यांवर आपले मत तयार ठेवा.
- आत्मविश्वास ठेवा, आणि उत्तर देताना संयम ठेवा.
मनोबल आणि सातत्य :
ही परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात पण फक्त काहीशे उमेदवारांची निवड होते. म्हणून मानसिक ताकद, सातत्यपूर्ण अभ्यास, आणि वेळेचं योग्य नियोजन अत्यंत गरजेचं आहे. अपयश आले तरी हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि ठरवलेल ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करा.
CAPF Force चे कार्य काय असते?

सशस्त्र सुरक्षा बल देशाच्या अंतर्गत सुरक्षा, सीमांचे संरक्षण, औद्योगिक सुरक्षा आणि अतिरेकी कारवायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जबाबदार असतो. या बलातील अधिकारी आणि जवान विविध राज्यांमध्ये निवडणूक ड्युटी, नक्षलप्रभावित भागात ऑपरेशन, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत कार्यात सहभागी असतात. त्यामुळे ही नोकरी केवळ सरकारी नोकरी नसून एक कर्तव्यभावनेने ओतप्रोत भरलेली सेवा आहे. CAPF Exam Preparation
CAPF Vacancies Per Year
दरवर्षी UPSC CAPF AC परीक्षेमार्फत साधारणतः 250 ते 300 पदांची भरती केली जाते. मात्र अर्ज करणाऱ्यांची संख्या 3 ते 5 लाखांपर्यंत जाते. याचा अर्थ, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आपल्या तयारीत काही पावले पुढे राहावे लागेल.
CAPF Paper I Details

Paper I – General Ability & Intelligence (Objective – 250 गुण)
- Duration: 2 तास
- Negative Marking: आहे (1/3)
- Medium: हिंदी आणि इंग्रजी दोन्ही
विषय (Subject):
- General Mental Ability (reasoning, numerical ability)
- General Science (basic science knowledge)
- Current Events (national and international importance)
- Indian Polity and Economy
- History of India – Freedom Movement, Modern History
- Indian and World Geography – Physical, Social, Economic
टीप: यामध्ये कोणताही भाग दुर्लक्षित करू नका. विशेषतः चालू घडामोडी, पोलीटि आणि भूगोल या तीन क्षेत्रांवर UPSC भर देते. CAPF Exam Preparation
CAPF Paper II Details
Paper II – General Studies, Essay, and Comprehension (Descriptive – 200 गुण)
- Duration: 3 तास
- Medium: काही भाग हिंदी किंवा इंग्रजी, तर काही फक्त इंग्रजी (Comprehension)
विषय (Subject): पुढील विषय या परीक्षेमद्धे असणार आहेत.
- Essay Writing – (2 निबंध, सामाजिक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय विषय)
- Precis Writing
- Comprehension
- Report Writing
- Grammar, Usage, Vocabulary
लेखन कौशल्य अत्यंत महत्त्वाचं आहे. UPSC तुमचा विचार स्पष्ट मांडण्याचा दृष्टिकोन, मुद्देसूद लेखन आणि अचूक इंग्रजीचा वापर यावर भर देते. CAPF Exam Preparation
सशस्त्र सुरक्षा बलातील जीवनशैली
एकदा तुम्ही CAPF मध्ये Assistant Commandant म्हणून निवडले गेलात, की तुम्हाला एक गट अ दर्जाचं अधिकारी पद मिळतं. ही नोकरी अत्यंत प्रतिष्ठित असून त्यात सुरक्षा, वसतिगृह, वाहन, मेडिक्लेम, पेंशन यासारख्या अनेक फायदे आहेत. मात्र ही फील्ड वर्कची नोकरी असल्यामुळे पोस्टिंग कधीही कुठेही होऊ शकते, हे लक्षात घ्या.
Time Management for CAPF Exam Preparation
CAPF परीक्षेची तयारी करताना सतत अभ्यासाची प्रेरणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अभ्यास करत असताना रोज रोज तीच तीच काही गोष्टी म्हणल्यावर अभ्यासाचा कंटाळा येतो. त्यामुळे पुढील लक्षात ठेवा:
- अभ्यास करताना वेळ ठरवा आणि त्यास कटाक्षाने पाळा.
- एका वेळेस एक विषय आणि एक टॉपिक पूर्ण लक्ष देऊन शिकावा.
- रोज सकाळी 15 मिनिटं देशातील बातम्या वाचा.
- दर आठवड्याला स्वतःची तयारी जाचकपणे तपासा.
- Social Media चा उपयोग फक्त शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठीच करा.
CAPF वर आधारित करिअर पथ
CAPF मध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या समोर पुढील पदोन्नतीच्या संधी असतात:
- Assistant Commandant (AC)
- Deputy Commandant
- Second-in-Command
- Commandant
- DIG (Deputy Inspector General)
- IG (Inspector General)
CAPF Exam Coaching
जर तुम्ही स्वतःहून तयारी करणारे स्टुडंट असाल, तर वरील मार्गदर्शनानुसार तयारी केल्यास कोचिंगची फार गरज पडत नाही. मात्र पहिल्यांदाच तयारी करणाऱ्यांनी किंवा वेळेचं नियोजन करणं जमत नसेल, तर कोचिंग उपयोगी पडू शकते. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जसे की Unacademy, Drishti, BYJU’S, StudyIQ यांचा उपयोग करू शकता. CAPF Exam Preparation
CAPF परीक्षेतील सामान्य चुका : CAPF Exam Preparation करत असताना बहुतेक उमेदवार पुढील चुका कर्ततात. त्या तुम्ही टाळल्या पाहुजेत.
- फक्त General Studies वर भर देणे, पण लेखनाचा सराव न करणे.
- चालू घडामोडीवर दुर्लक्ष करणे.
- Comprehension आणि Precis Writing ची तयारी न करणे.
- Physical Test साठी शेवटी तयारी करणे (खूप मोठी चूक!)
- Mock Test न सोडवता थेट परीक्षा देणे. शेवटचं एक महत्वाचं वाक्य…
💻 महत्वाच्या अपडेट साठी आपला तेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
CAPF Exam Preparation ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे अशा परीक्षेची तयार करत आहेत. जेणेकरून त्यांना थोडी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :