How to Become a CA Marathi Information: चार्टर्ड अकाउंटंट (CA) कसे व्हायचे? पहा पूर्ण माहिती

How to Become a CA Information in Marathi

CA

मित्रांनो भारतात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होणे हे एक अत्यंत प्रतिष्ठेचे आणि कठीण करियर पर्याय मानले जाते. तर आज आपण या लेखामध्ये How to Become a CA बद्दल ची सर्व माहिती पाहणार आहोत. आर्थिक व्यवस्थापन, ऑडिटिंग, करसल्ला यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्कृष्ट दिशा असते. ICAI (Institute of Chartered Accountants of India) ही संस्था भारतातील CA अभ्यासक्रम नियंत्रित करते.

तर चला पुढे आपण How to Become a CA ची पूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप व Telegram ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

CA कसे बनावे?

How to Become a CA After 12th

जर तुमचेही स्वप्न असेल CA बनायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक पात्रता असणे गरजेचे असते. त्याची माहिती पुढे दिली आहे. CA कोर्ससाठी 10वी नंतर तयारी सुरू करता येते, पण प्रवेश १२वी नंतर होतो. खालील दोन्ही मार्गांनी CA कोर्सला सुरुवात करता येते. पुढे पहा त्याची सर्व माहिती.

How to Become a CA After 12th

Foundation Route (12वी नंतर): 12वी नंतर तुम्ही पुढील पाहू शकता.

  • 12वी (Commerce / Science / Arts) उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना CA Foundation Course साठी नावनोंदणी करता येते.
  • ही परीक्षा वर्षातून दोन वेळा (मे व नोव्हेंबर) घेतली जाते.
  • विषय: यासाठी पुढील विषय असतात.
    • Business Mathematics, Logical Reasoning & Statistics
    • Principles and Practice of Accounting
    • Business Laws and Business Correspondence
    • Business Economics and Business and Commercial Knowledge

How to Become a CA After Graduation

Direct Entry (पदवीधर विद्यार्थ्यांसाठी): पदवीनंतर तुम्ही कश्या प्रकारे CA बनू शकता त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • Commerce मध्ये 55% किंवा इतर शाखांमध्ये 60% गुण असलेल्या पदवीधर थेट CA Intermediate मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
  • Foundation परीक्षा देणे आवश्यक नाही.

Intermediate Course

CA

आता तुम्हाला पुढे Chartered Accountant म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या काही महत्वाच्या स्टेप्स दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक पहा.

  • ज्यावेळेस Foundation परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर किंवा Direct Entry द्वारे Intermediate Course मध्ये प्रवेश दिला जातो.
  • दोन गट असतात:
    • Group 1: Accounting, Corporate Laws, Costing, Taxation
    • Group 2: Advanced Accounting, Auditing, EIS-SM, FM-Eco
  • विद्यार्थ्यांना या दोन्ही गटांच्या परीक्षा एकत्र किंवा स्वतंत्रपणे देता येतात.

हेही वाचा :

Krushi Utpanna Bazar Samiti Sambhajinagar Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर मध्ये नवीन भरती!

 Articleship Training

 Articleship Training ही 3 वर्षाची ट्रेनिंग आसते.

  • Intermediate चा किमान एक गट उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ICAI मान्यताप्राप्त चार्टर्ड अकाउंटंटच्या मार्गदर्शनाखाली ३ वर्षांची Articleship Training करावी लागते.
  • या प्रशिक्षणात प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, जसे की ऑडिट, टॅक्स फायलिंग, बँकिंग इत्यादी.

CA Final

  • जेव्हा तुमची 3 वर्षांची Articleship पूर्ण होत आल्यावर, विद्यार्थ्यांना CA Final Course ची परीक्षा द्यावी लागते.
  • ही परीक्षा दोन गटांमध्ये घेतली जाते:
    • Group 1: Financial Reporting, Strategic Financial Management, Advanced Auditing, Corporate & Economic Laws
    • Group 2: Strategic Cost Management, Direct Tax Laws, Indirect Tax Laws, Elective Paper (Risk Management, Financial Services इ.)
💻 महत्वाच्या अपडेट साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

CA प्रमाणपत्र व सदस्यता

  • Final परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, ICAI मार्फत “चार्टर्ड अकाउंटंट” म्हणून नोंदणी केली जाते.
  • नंतर ICAI ची सदस्यता घेऊन स्वतःचा सराव सुरू करता येतो किंवा कंपनी/फर्ममध्ये नोकरी करता येते.

CA होण्यासाठी मेहनत, सातत्य आणि चिकाटी अत्यावश्यक आहे. ही वाट खडतर असली तरी यश मिळाल्यानंतर मोठ्या संधींचे दरवाजे उघडतात. जर तुम्हाला आर्थिक विषयामद्धे रुचि असेल असेल तर तुम्ही यामध्ये करियर करू शकता आणि High Paying Job मिळवू शकता.

How to Become a CA Information in Marathi ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे CA बनू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना थोडी मदत होईल. आणि त्यांना याबद्दल पूर्ण माहिती मिळेल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट ला आवशी भेट देत जा.

ही अपडेट पहा :