जलसंधारण विभागात 8667 पदे मंजूर! या दिवसापासून भरतीला सुरुवात; Jalsandharan Vibhag Bharti 2025

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2025 Notification

maharashtra government

Jalsandharan Vibhag Bharti 2025: मित्रांनो जर भरतीची तयारी करत असा तर ही खूप मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील मृद व जलसंधारण विभागात आता तब्बल 8667 रिक्त पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी 14 जुलै रोजी विधान परिषदेत दिली आहे. ही भरती उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

सन 2017 मध्ये शासनाने मृद आणि जलसंधारण विभागाची स्थापना मान्य केली होती. त्यावेळी 16 हजार 423 पदांचा एक आकृतीबंध तयार करण्यात आला होता. ही पदे जलसंपदा व कृषी विभागांकडून नव्याने निर्माण होणाऱ्या विभागाकडे वर्ग करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही पदे विभागाला मिळू शकली नाहीत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

या भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअप तसेच टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

राज्यातील बदलत्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून, विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला आणि तो उच्चस्तरीय समितीकडे सादर केला. या आकृतीबंधात 8 हजार 667 नव्या पदांचा समावेश आहे. त्यातील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून, उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.

जलसंधारण विभागात 8667 पदांची मंजुरी

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नव्याने तयार झालेल्या आकृतीबंधवर भाष्य केले त्यात ते असे म्हणाले, राज्यातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार केला, या मार्फत Maharashtra Government Jobs आता 8667 पदांचा समावेश करण्यात आला.

या मधील अनावश्यक पदे वगळण्यात आली असून, उर्वरित पदांना उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पुढे तुम्ही X वरील त्यांचा या संबंधीचा व्हिडिओ पाहू शकता.

ही अपडेट पहा : AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2300+ पदांची मेगा भरती.

मृदा आणि जलसंधारण विभाग भरती 2025 New Update

या निर्णयामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल, जलसंधारण कामांना वेग मिळेल आणि राज्यातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळेल. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. याशिवाय, विधान परिषदेत आणखी एक महत्त्वाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, विभागाच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण झाले होते.

ज्या योजनांना लोकांचा विरोध होता, ज्या योजना वनजमिनीच्या मुद्द्यावरून प्रलंबित होत्या, तसेच ज्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्षात सुरूवात झाली नव्हती – अशा कामांचा सखोल आढावा घेऊन ती रद्द करण्यात आली आहेत. मात्र, भविष्यात गरज भासल्यास त्या योजनांचे पुन्हा एकदा पुनरावलोकन करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सविस्तर माहिती साठी ग्रुप (Details)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
alsandharan Vibhag Bharti 2025 ही माहिती तुमच्या भरतीची तयारी करणार आहे तर मित्रांना लगेच शेअर करा आणि राज्यातील व देशातील अशाच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग ह्या अधिकृत वेबसाईटला भेट देत जा.

ही अपडेट पहा :

भरती बद्दल काही महत्वाचे प्रश्न :

मृदा आणि जलसंधारण विभाग भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

8667 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.