Kotak Junior Scholarship Program 2025-26

मित्रांनो तुम्ही पण 10वी पास आहेत का? आणि तुम्हालाही आर्थिक मदतीची गरज आहे का? तर सध्या Kotak Junior Scholarship Program 2025-26 द्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी कोटक एज्युकेशन फाउंडेशनने सुरू केलेली ही योजना शिक्षणासाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. ही योजना खासकरून मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.
या स्कॉलरशिप मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्यच नाही, तर मार्गदर्शन, शैक्षणिक सहकार्य, करिअर गाईडन्स आणि विविध ज्ञानवर्धक भेटींचाही लाभ मिळणार आहे. म्हणजेच हा फक्त पैशाचा नाही, तर एक संपूर्ण शिक्षण विकासाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे या संधीचा लाभ तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे.
Kotak Junior Scholarship Program 2025 Information in Marathi
स्कॉलरशिप प्रोग्राम ची थोडक्यात माहिती :
घटक | माहिती |
---|---|
शिष्यवृत्तीचे नाव | Kotak Junior Scholarship Program 2025-26 |
आयोजक संस्था | Kotak Education Foundation (KEF) |
योजनेचे उद्दिष्ट | आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत |
पात्रता क्षेत्र | फक्त मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) |
आवश्यक पात्रता | 10वी उत्तीर्ण (SSC/CBSE/ICSE – 2025), किमान 85% गुण |
मिळणारा एकूण लाभ | ₹3,500/महिना – एकूण ₹73,500 (21 महिने) + मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जून 2025 ही शेवटची तारीख आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन – Buddy4Study प्लॅटफॉर्मवरून अर्ज करायचा आहे. |
Kotak Junior Scholarship Eligibility
आवश्यक पात्रता : जर तुम्ही Kotak Junior Scholarship Program 2025 या स्कॉलरशिप साठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे पुढील आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने 2025 मध्ये SSC/ CBSE/ICSE बोर्डांतून 10वी मध्ये 85% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेले असावे.
- विद्यार्थी सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) कनिष्ठ महाविद्यालयात (11वी) Arts, Commerce, Science या प्रवाहांपैकी कोणत्याही मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3,20,000 पेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब MMR क्षेत्रात वास्तव्यास असावे.
- Kotak Education Foundation आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले अर्जासाठी पात्र नाहीत.
ही अपडेट पहा : Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये 110 पदांची भरती!
Kotak Junior Scholarship 2025 Benefits
कोटक जूनियर स्कॉलरशिप फायदे : या स्कॉलरशिप चे नेमके कोणते कोणते फायदे विद्यार्थ्याला होणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- या स्कॉलरशिप च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहिना ₹3,500 (एकूण ₹73,500 – 21 महिने) शिष्यवृत्ती. मिळणार आहे.
- मार्गदर्शन व संरक्षक आधार (Mentorship Support).
- शैक्षणिक सहाय्य, जे अभ्यासात यशस्वी होण्यासाठी मदत करेल.
- करिअर मार्गदर्शन – भविष्यातील संधींसाठी योग्य दिशा.
- शैक्षणिक व ज्ञानवर्धक भेटी – Exposure Visits.
महत्वाचे: ही शिष्यवृत्ती शैक्षणिक खर्चासाठी (प्रवेश शुल्क, स्टेशनरी, पुस्तकं, प्रवास इ.) वापरण्यात येईल आणि निधी त्रैमासिक/ सहामाही स्वरूपात दिला जाईल. त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या.

Kotak Junior Scholarship Program 2025 Required Documents
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची लिस्ट पुढे दिली आहे.
- 10वीचे मार्कशीट (SSC/CBSE/ICSE)
- उत्पन्नाचा दाखला (F.Y. 2025-26)
- अलीकडील पासपोर्ट साइज फोटो – अनिवार्य
- कमावणाऱ्या पालकाचा PAN कार्ड
- स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट
- जर कुणी IT भरत असेल, तर IT रिटर्न + Form 16 (ऐच्छिक)
- एकट्या पालक असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे बँक खाते (बँक स्टेटमेंट किंवा पासबुकची पहिली पान)
इत्यादि डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या स्कॉलरशिप साठी अर्ज करता येणार आहे.
How to Apply for Kotak Junior Scholarship 2025-26
अर्ज कसा करावा? :
- तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावर जा आणि ‘Apply Now’ वर क्लिक करा.
- तुमच्या ईमेल / मोबाइल / Gmail वापरून लॉगिन किंवा नवीन खाते तयार करा.
- लॉगिन केल्यानंतर ‘Kotak Junior Scholarship Program 2025-26’ अर्ज फॉर्मवर जा.
- ‘Start Application’ वर क्लिक करा.
- अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून घ्या.
- कागदपत्रे अपलोड करा.
- Terms & Conditions स्वीकारा आणि ‘Preview’ वर क्लिक करा.
- सर्व माहिती बरोबर असल्यास ‘Submit’ वर क्लिक करून अर्ज पूर्ण करा.
अशा पद्धतीने तुम्ही या स्कॉलरशिप साठी मोबाइल मधून ऑनलाइन अर्ज करू शकता.
Kotak Junior Scholarship 2025-26 Selection Process
निवड प्रक्रिया : या स्कॉलरशिप प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांची निवड पुढील पद्धतीने करण्यात येते.
- पात्रतेच्या आधारे प्राथमिक शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची फोनवरून मुलाखत घेतली जाईल.
- अंतिमत: योग्य उमेदवारांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
Kotak Junior Scholarship 2025 Apply Online

पुढे तुम्हाला या स्कॉलरशिप साथी अर्ज करण्याची लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.
💻 आपला टेलेग्राम चॅनल जॉइन करा | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Kotak Junior Scholarship 2025-26 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला रोज भेट देत जा.
महत्वाची अपडेट :
काही महत्वाचे प्रश्न :
Kotak’s Junior Scholarship साठी कोण पात्र आहे?
या स्कॉलरशिप साठी ते विद्यार्थी पात्र आहेत ज्यांनी 2025 मध्ये 10वी परीक्षा (SSC/CBSE/ICSE) 85% किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण केली आहे आणि सध्या मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील (MMR) ज्युनिअर कॉलेजमध्ये 11वीमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना या स्कॉलरशिप चा लाभ मिळणार आहे.
Kotak Junior Scholarship 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Kotak Junior Scholarship Program 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे.