Mirae Asset Scholarship 2025

मित्रांनो कित्येक वेळा आपल्याला शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणे आवश्यक असते, आणि हाच आधार देण्यासाठी Mirae Asset Scholarship 2025 पुढे आले आहे. ही शिष्यवृत्ती देशभरातील अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.
Mirae Asset Foundation मार्फत चालवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य द्यावं आणि त्यांची शैक्षणिक वाटचाल सुलभ करावी. पुढे तुम्हाला या स्कॉलरशिप बद्दलची सर्व माहिती पाहायला मिळणार आहे.
Mirae Asset Scholarship 2024-25
या स्कॉलरशिप बद्दल थोडक्यात माहिती पुढील चार्ट मध्ये दिली आहे.
घटक | माहिती |
---|---|
शिष्यवृत्तीचे नाव | Mirae Asset Scholarship 2024-25 |
संस्थेचे नाव | Mirae Asset Foundation |
स्कॉलरशिप चे उद्दिष्ट | गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे |
पात्र विद्यार्थी | अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थी (PAN India) |
शिष्यवृत्ती रक्कम | UG – ₹40,000 पर्यंत, PG – ₹50,000 पर्यंत |
अर्ज प्रक्रिया | Online (Buddy4Study पोर्टलवरून) |
निवड प्रक्रिया | मेरिट + आर्थिक स्थिती + इंटरव्ह्यू |
Mirae Asset Scholarship 2025 Information in Marathi
मित्रांनो Mirae Asset Scholarship 2025 हा CSR उपक्रम Mirae Asset Foundation च्या वतीने राबवण्यात येतो. देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ही शिष्यवृत्ती खालील प्रमाणे दिली जाते:
- UG विद्यार्थ्यांसाठी – ₹40,000 पर्यंत
- PG विद्यार्थ्यांसाठी – ₹50,000 पर्यंत
शिष्यवृत्तीची रक्कम थेट संस्थेच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि त्यामध्ये शिक्षण शुल्क, होस्टेल फी, मेस चार्जेस व इतर शैक्षणिक खर्च समाविष्ट असतो. त्यामुळे तुम्ही देखील या स्कॉलरशिप चा लाभ नक्की घ्या.
Mirae Asset Scholarship 2024-25 Eligibility Criteria
आवश्यक पात्रता : तर मित्रांनो जर तुम्हाला या scholarship चा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पुढे पहा.
- भारतातील कोणत्याही राज्यातील UG/PG कोर्समध्ये शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात
- मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण असणे आवश्यक
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असावे
- UG विद्यार्थ्यांनी भरलेली शैक्षणिक फी ₹40,000 पेक्षा कमी नसावी.
- PG विद्यार्थ्यांसाठी ती ₹50,000 पेक्षा कमी नसावी.
ही योजना पहा :
CISF Sports Quota Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 403 जागांसाठी भरती!
Mirae Asset Scholarship 2025 Benefits

मिराई स्कॉलरशिप योजनेचे फायदे : या स्कॉलरशिप मधून नेमके कोणते फायदे विद्यार्थ्यांना होणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- UG विद्यार्थ्यांना ₹40,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळते.
- PG विद्यार्थ्यांसाठी ₹50,000 पर्यंत शिष्यवृत्ती आहे.
ही रक्कम थेट संस्थेच्या खात्यात जमा केली जाते आणि यामध्ये पुढील खर्च समाविष्ट असतो:
- Tuition Fees
- Hostel Charges
- Mess Charges
- इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी लागणारा खर्च
Documents Required for Mirae Asset Scholarship 2025
आवश्यक कागदपत्रे : तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- चालू वर्षाचा ऍडमिशन लेटर आणि संस्थेचे बँक डिटेल्स
- मागील वर्षाचा मार्कशीट आणि 12वी चा मार्कशीट
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचे पुरावे – खालील तीन पैकी कुठलेही:
- पालकांचा ITR
- पगार पावती
- EWS सर्टिफिकेट (स्वयंरोजगार पालकांसाठी) जर लागू होत असेल तर:
- ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट
- अपंगत्व प्रमाणपत्र
- OBC सर्टिफिकेट
Mirae Asset Scholarship 2024-25 Selection Process
निवड प्रक्रिया : या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड पुढील टप्प्याद्वारे करण्यात येते:
- शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि आर्थिक स्थितीच्या आधारे प्राथमिक शॉर्टलिस्टिंग.
- टेलिफोनिक इंटरव्ह्यू.
- कागदपत्रांची पडताळणी.
- अंतिम निवड Mirae Asset Foundation करेल.
How to Apply for Mirae Asset Scholarship 2025

अर्ज कसा करावा? : Mirae Asset Scholarship साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:
- Buddy4Study पोर्टलवर लॉगिन करा किंवा नवीन अकाउंट तयार करा
- “Mirae Asset Foundation Scholarship Program 2024-25” या स्कॉलरशिपवर क्लिक करा
- ‘Start Application’ बटणावर क्लिक करा
- सर्व आवश्यक माहिती फॉर्ममध्ये भरा
- मागितलेली कागदपत्रे अपलोड करा
- ‘Terms and Conditions’ स्वीकारा आणि ‘Preview’ बघा
- सर्व माहिती योग्य असल्यास ‘Submit’ करा
लक्षात ठेवा : तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतरच अर्ज सबमिट करा.
Mirae Asset Scholarship 2024-25 Apply Online
अर्ज पद्धती : या स्कॉलरशिप साठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट मोबाइल मधून देखील अर्ज करू शकणार आहेत.
💻 आपला टेलेग्राम चॅनल जॉइन करा | येथे क्लिक करा |
📄 शिष्यवृत्तीचे नाव | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Mirae Asset Scholarship Program 2025 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!