Top 10 Skill Based Jobs in India In Marathi
मित्रांनो या लेखामध्ये आपण Top 10 Skill Based Jobs in India बद्दल माहिती पाहणार आहोत. कारण आजच्या डिजिटल युगात शिक्षणासोबतच स्किल्सचे महत्त्व खूप वाढले आहे. सध्या तुमच्याकडे फक्त डिग्री असून चालत नाही, तर आपल्या हातात असलेले कौशल्यच (Skill) आपल्याला करिअरमध्ये यशस्वी बनवते.
आणि यामुळेच आता अनेकजण स्किल बेस्ड जॉब्स (Skill Based Jobs) चा पर्याय निवडत आहेत. हे जॉब्स फक्त तुमच्या कौशल्यावर आधारित असतात, आणि त्यासाठी डिग्री किंवा मोठ्या प्रमाणात अनुभवाची गरज नसते. तर हवी असते तुमच्याकडे एक स्पेसिफिक स्किल. तर तुम्हाला यामध्ये करिअर कसं सुरू करता येईल याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
Skill Based Job Opportunities in India
सर्वात अगोदरआपण हे समजून घेऊ की Skill Based Job म्हणजे काय? तर असा नोकरीचा पर्याय जिथे तुमचे हातचे कौशल्य, टेक्निकल ज्ञान, क्रिएटिव्ह अॅबिलिटी किंवा विशिष्ट स्किल वापरून काम केलं जातं. या जॉब्समध्ये शैक्षणिक पात्रतेपेक्षा कौशल्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. जसे की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन, फोटो/व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग, लेखन किंवा सेल्स यामधील स्किल्स असतील, तर तुम्ही सहज या फील्डमध्ये जॉब करू शकता.
तुम्ही हे क्षेत्र का निवडावे?: तर मित्रांनो कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याकडे ती गोष्ट करण्याचे ठोस कारण असलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र का निवडावं हे तुम्ही पुढे पाहू शकता.
- जास्त कमाईची संधी अशा प्रकारचे जॉब्स मध्ये मिळते.
- डिग्रीची गरज नाही
- फ्रीलान्सिंग/वर्क फ्रॉम होम संधी
- स्वतःचं ब्रँड किंवा व्यवसाय सुरू करता येतो
- अल्प मुदतीत स्किल शिकून जॉब मिळवता येतो
या प्रकारच्या नोकऱ्या आजच्या काळात फक्त भारतातच नाही, तर जागतिक पातळीवर देखील प्रचंड डिमांडमध्ये आहेत. Top 10 Skill Based Jobs in India
हेही वाचा :
Skill Based Jobs Type in India
Skill Based Jobs चे मुख्य प्रकार : मित्रांनो पुढे अशा काही Skill Based Jobs ची माहिती दिली आहे जे तुम्ही 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर करू शकता.
- डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
- ग्राफिक डिझाईन (Graphic Designing)
- वेब डेव्हलपमेंट (Web Development)
- व्हिडिओ एडिटिंग आणि अॅनिमेशन
- Content Writing / Blogging
- Electrician / Plumber / Technician Jobs
- Data Entry / Typing Jobs
- Makeup Artist / Hairstylist
- Mobile Repairing / Hardware Technician
- फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी
या सर्व Skill Based Jobs मध्ये तुम्ही तुमचे करियर करू शकता. तर चला आता आपण या प्रत्येक पर्यायाची सविस्तर माहिती पाहूया. Top 10 Skill Based Jobs in India
डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
मित्रांनो आजकाल आपण पाहतो कोणताही बिजनेस असू द्या त्या बिजनेस वाल्यांना त्यांचे प्रमोशन करायचं आहे. कोणी एड्स प्रमोशन करतं तर कोणी सेलिब्रिटीच्या माध्यमातून प्रमोशन करत असतात. त्यामुळे ज्या लोकांकडे डिजिटल मार्केटिंग स्किल आहे त्यांना खूप स्कोप आहे आणि यामध्ये पैसा देखील भरपूर मिळतो. यामध्ये नेमका तुमच्याकडे कोणते स्किल असलं पाहिजे ते पुढे पहा.
- स्किल्स – SEO, Social Media Marketing, Email Marketing, Google Ads
- Income (कमाई) – 15,000 ते 1,00,000+ पर्यंत तुम्ही यामधून कमाई करू शकता. पण जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त फ्रीलान्सिंग एजन्सी सुरू केली तर अधिक पैसे मिळू शकतात. Top 10 Skill Based Jobs in India
हेही पहा :
ग्राफिक डिझाईन (Graphic Designing)
ग्राफिक डिझाईन (Graphic Designing) मध्ये जर तुम्हाला करियर करायचे असेल तर तुम्ही Photoshop, Illustrator, Canva वापरून बॅनर्स, लोगो, सोशल मीडिया पोस्ट तयार करायच शिकून यामध्ये करिअर करू शकता.
- स्किल्स – Creativity, Tools Knowledge, Branding Sense
- कमाई – 10,000 ते 1,00,000 (फ्रीलान्सिंगने जास्त)
वेब डेव्हलपमेंट (Web Development)
जर तुम्हाला कोडिंगची आवड असेल तर HTML, CSS, JavaScript, React, PHP इ. शिकून वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू शकता. आणि जर तुमच्याकडे हेच केलं असेल तर तुम्ही विदेशातील कस्टमर साठी काम करू शकता. आणि आकर्षक विणकाम करू शकता.
- स्किल्स – Frontend, Backend Development, WordPress
- कमाई – 20,000 पासून सुरुवात – पुढे लाखो रुपयांपर्यंत
व्हिडिओ एडिटिंग आणि अॅनिमेशन
आता आपण तर पाहतच आहोत की दिवसेंदिवस व्हिडिओ क्रिएटरची संख्या वाढत आहे. आणि त्यासोबतच व्हिडिओ एडिट करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे यामध्ये करिअर करण्याची तुम्हाला मोठी संधी आहे. Instagram Reels, YouTube Shorts, व्लॉग्स यासाठी व्हिडिओ एडिटिंग करणार्यांची मागणी वाढली आहे. Top 10 Skill Based Jobs in India
- स्किल्स – Adobe Premiere Pro, After Effects, CapCut
- कमाई – 500 ते 10,000 प्रति प्रोजेक्ट (फ्रीलान्सिंगमध्ये प्रचंड संधी)
Content Writing/ Blogging
जर तुम्हाला लेखन करण्यामध्ये आवड असेल तर हे करिअर ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. कारण यामध्ये तुम्ही Content Writer किंवा Blogger होऊ शकता. आणि यासोबतच तुम्ही लिहू शकत असाल तर इतर प्रोजेक्ट मिळतात. Top 10 Skill Based Jobs in India
- स्किल्स – Grammar, SEO Writing, Research
- कमाई – 0.50 ते 5 प्रति शब्द (प्रोजेक्टनुसार वाढ होते.)
Data Entry/ Typing Jobs
जर तुमची टायपिंग झालेले असेल आणि तुम्हाला कम्प्युटर बद्दल बेसिक नॉलेज असेल तर तुम्हाला या फिल्डमध्ये जॉब मिळू शकतो.
- स्किल्स – Fast Typing, MS Office, Accuracy
- कमाई – 8,000 ते 25,000 दरमहा
Electrician/ Plumber/ Technician Jobs
हेही पूर्णपणे स्किल बेस्ड जॉब्स आहेत. जरी तुमच्या शिक्षण कमी झालेले असेल तरी पण तुम्ही या व्यवसायांमधून चांगले उत्पन्न मिळू शकतात.
- स्किल्स – Practical Knowledge, Training
- कमाई – ₹300 ते ₹1000+ प्रतिदिन (कामावर अवलंबून)
Makeup Artist/ Hairstylist
आता बऱ्याच जणांचा समज असा असतो की, मेकअप आर्टिस्ट फक्त मुलीच असतात. यामध्ये पुरुष देखील करिअर करू शकतात. ही अत्यंत क्रिएटिव्ह आणि प्रचंड डिमांड असलेला फील्ड. ट्रेनिंगनंतर स्वतःचा सलून किंवा फ्रीलान्स काम सुरू करता येते. Top 10 Skill Based Jobs in India
- स्किल्स – Beauty Sense, Practical Training
- कमाई – 500 ते 5000 प्रति क्लायंट
हेही पहा :
Mobile Repairing/ Hardware Technician
मोबाईल, लॅपटॉप यांचे सर्व्हिसिंग करणारे टेक्निशियन आज प्रत्येक ठिकाणी गरजेचे आहेत.
- स्किल्स – Hardware Knowledge, Chip Level Repairing
- कमाई – 10,000 ते 50,000+ (दुकान किंवा सर्व्हिस सेंटरनुसार)
फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी
जर तुमच्याकडे Camera handling आणि फोटो व्हिडिओ एडिटिंग स्किल असेल तर तुम्ही Event Photographer/YouTuber म्हणूनही करिअर करू शकता.
- स्किल्स – Composition, Editing Tools, Lighting Knowledge
- कमाई – 5,000 ते 1 लाख प्रति इव्हेंट पर्यंत income करू शकता.
तर चला आता पाहूया आपण की कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये करियर सुरू करू शकता. त्यासाठी तुम्ही पुढील स्टेप follow करा.
- वरती ज्या Skill दिल्या आहेत त्यामधून तुम्हाला योग्य वाटेल ते स्किल निवडा.
- त्यानंतर त्या स्किल शी संबंधित ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोर्सेस करा – ऑनलाईन कोर्स तुम्ही YouTube, Coursera, Udemy, Skillshare यावरून स्किल शिका.
- प्रॅक्टिस करा आणि पोर्टफोलिओ बनवा – स्वतःचं काम दाखवण्यासाठी प्रोजेक्ट तयार करा.
- Freelancing सुरू करा. तुम्ही या पुढील प्लॅटफॉर्म वरती तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता. Fiverr, Upwork, Freelancer.com. आणि यावरून प्रोजेक्ट मिळवा
- क्लायंटसह नेटवर्क तयार करा – सोशल मिडिया, लोकल बिझनेस यांच्याशी संपर्क ठेवा
- व्यवसायात बदला – नोकरी करून सुरुवात करा, पुढे स्वतःचा ब्रँड किंवा एजन्सी सुरू करा
💻 अपडेट साठी आपला टेलिग्राम चैनल | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
मित्रांनो एक गोष्ट लक्षात सध्या कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि यामध्ये तुमच्याकडे फक्त कोणती डिग्री असून चालणार नाही. जर तुम्हाला जॉब मिळवायचे असेल तर तुमच्याकडे डिग्री सोबतच काहीतरी स्किल असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वेळ आहे तुमचं छुपं कौशल्य ओळखण्याची आणि त्यावर मेहनत घेण्याची.
कारण आजकाल तुम्ही सोशल मीडिया वरती बघत असाल ज्यांच्याकडे स्पेसिफिक स्किल आहे असे लोक मध्ये पैसे कमवत आहेत. तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तेच काम तुम्ही का करू शकत नाही? आणि आजच तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहेत त्याबद्दल स्किल डेव्हलप करा. आणि या स्पर्धेचे युगामध्ये इन्कम सोर्स बनवा.
Top 10 Skill Based Jobs in India शेअर करा ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत जे फक्त डिग्रीच्या भरवशावर बसलेले आहेत. जेणेकरून त्यांनाही समजेल की फक्त डिग्री असून चालणार नाही त्यासोबत काही ना काही स्किल पण असणे आवश्यक आहे. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या अधिकृत वेबसाईटला भेट देत जा.
ही अपडेट पहा :