Vanrakshak Bharti Selection Process 2025: वनरक्षक भरती ची निवड प्रक्रिया पूर्ण माहिती!

Vanrakshak Bharti Selection Process Information

Vanrakshak Bharti Selection Process: मित्रांनो राज्यातील लाखों उमेदवार वन रक्षक भरतीची तयारी करत आहेत. परंतु तयारी करत असताना तुम्हाला Van Vibhag Bharti Nivad Prakriya कशा पद्धतीने होते याची माहिती असणे आवश्यक असते. कारण कोणत्याही भरतीची तयारी करत असताना त्या भरतीची सर्व माहिती असेल तरच त्या भरतीसाठी केलेली तयारी फळाला येते.

तर आज आपण या लेखामध्ये Van Rakshak Bharti Selection Process ची सगळी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि जर अशीच महत्वाची माहिती हवी असेल तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Van Vibhag Bharti Selection Process Details

आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे वन रक्षक भरती ची निवड प्रक्रिया पुढील टप्प्याद्वारे केली जाते.

  1. लेखी परीक्षा (Written Test)
  2. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  3. शारीरिक चाचणी (Physical Test)
  4. अंतिम निवड (Final Selection)

तर चला आता या सर्व स्टेप ची सविस्तरपणे माहिती पाहूया. Vanrakshak Bharti Selection Process

Vanrakshak Bharti Exam Pattern

वनरक्षक भरती परीक्षा पॅटर्न : मित्रांनो वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (CBT Test) द्वारे घेण्यात येईल. आणि या परीक्षेमद्धे पुढील विषय असतात आणि मार्क्स पुढील प्रमाणे असतात.

विषयाचे नावप्रश्नसंख्यागुण
सामान्य ज्ञान1530
बुद्धिमत्ता चाचणी1530
मराठी1530
English1530
एकूण60120

महत्वाचे : या परीक्षेमद्धे किमान 40% गुण आवश्यक असतात ग्राउंड चाचणी साठी सिलेक्ट होण्यासाठी. आणि परीक्षेचे स्वरूप MCQ प्रश्न, Online CBT Test, निगेटिव्ह मार्किंग नाही. Vanrakshak Bharti Selection Process

हेही वाचा : Van Sevak Bharti 2025: वन सेवक पदाच्या तब्बल 12000 पेक्षा जास्त पदांची भरती!

Vanrakshak Bharti Document Verification Process

वन विभाग भरती कागदपत्रे पडताळणी प्रोसेस : मित्रांनो लेखी परीक्षेनंतर दूसरा टप्पा असतो तो लेखी परीक्षेमद्धे पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी चा. तर तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक असते.

  1. Aadhar Card
  2. 10th 12th Marksheet (SSC / HSC Marksheet)
  3. Graduation Marksheet (Degree in any discipline)
    • Note : Education qualification remains as per recruitment so forest department recruitment can be 10th 12th above or graduate.
  4. Domicile Certificate
  5. Non Creamy Layer Certificate
  6. Caste Certificate
  7. Passport size photo
  8. Signature
  9. Email ID
  10. Mobile Number
  11. EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  12. महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

हेही वाचा : Police Bharti Information in Marathi: पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती हवीच!

Van Vibhag Bharti Documents Verification

वन विभाग भरती चा पेपर दिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड होत असते. त्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलवले जात असते. तर तुम्ही पेपर जरी पास झाले परंतु डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस म्हणजेच कागदपत्रे पडताळणीच्या वेळी – डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस कोण कोणती कागदपत्रे लागतात त्याची लिस्ट पुढे दिली आहे.

  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
  • इतर आवश्यक कागदपत्रे

टिपः वरील 3 कॅटेगिरी चे कागदपत्रे असतात याच्यातून उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे त्याची शिक्षण किती व कोणते झाले आहेत त्या पद्धतीने नुसार लागत असतात. Vanrakshak Bharti Selection Process

वन विभाग भरती शैक्षणिक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
  • 10 वी 12 वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
  • पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) पुढे शिक्षण झाले असल्यास
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे

  • अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
  • महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

इतर आवश्यक कागदपत्रे

  • 1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
  • 2) माजी सैनिक प्रमाणपत्र
  • 3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
  • 4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • 5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र
  • 6) लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
  • 7) लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी
  • 8) वन मजूर असल्यास प्रमाणपत्र
  • 9) अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र
  • 10) वन खबरे असल्यास प्रमाणपत्र

Vanrakshak Bharti Physical Qualification Process

Van Vibhag Bharti Ground Details : मित्रांनो कागदपत्रे पडताळणी नंतर उमेदवारांची ग्राउंड टेस्ट घेतली जाते. यामध्ये महिलांची ग्राउंड टेस्ट आणि उमेदवारांची ग्राउंड टेस्ट यामध्ये फरक आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

Van Vibhag Bharti Male Ground Test Details

पुरुष Candidate: पुरुषांची मैदानी चाचणी ही पुढील प्रकारची असते.

  • Running: 5 Km (17 मिनिटे) किंवा नियमांनुसार
  • उंची: किमान 163 सेमी
  • छाती: 79 सेमी (फुगवून 84 सेमी)

Van Vibhag Bharti Female Ground Test Details

महिला Candidate: महिला उमेदवारांची ग्राउंड चाचणी ही पुढील प्रकारची असते.

  • Running: 3 Km (12 मिनिटे) किंवा नियमांनुसार
  • उंची: किमान 150 सेमी

महत्वाचे : शारीरिक चाचणीसाठी पुरुष/ महिला साठी एकूण 80 गुण असतात. Vanrakshak Bharti Selection Process

💻 महत्वाच्या अपडेट साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Vanarakshak Final Selection & Merit List

वन विभाग भरती मेरीट लिस्ट : वन विभाग भरतीचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे अंतिम निवड प्रक्रिया म्हणजेच मेरीट लिस्ट. Vanrakshak Bharti Selection Process अशा पद्धतीने होते. मित्रांनो जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर वन विभाग भरती तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळे यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड वरील पद्धतीने होते हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने भरतीची तयारी करा.

मित्रांनो Vanrakshak Bharti Selection Process in Marathi ही माहिती तुमच्या वन विभाग भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट ला भेट देत जा.

ही माहिती देखील पहा :