CBSE Class 10th Exam Twice: यावर्षीपासून दहावीची परीक्षा दोन वेळा,पहा कोणते मार्क्स ग्राह्य धरले जाणार

CBSE Class 10th Exam News

मित्रांनो CBSE Class 10th Exam मध्ये मोठा Twice आला आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे. आता दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे, तर दुसरी मे महिन्यात होईल. पहिल्या परीक्षेत पास झालेल्यांनाच दुसरी परीक्षा देता येईल.

यामध्ये खेळाडूंना विशेष सवलत मिळणार आहे. ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील, तेच गुण ग्राह्य धरले जातील. सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. पुढे तुम्हाला याबद्दल सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
📢 नवीन अपडेट साठी चॅनलTelegram
 WhatsApp
📜 सर्व भरती अपडेट्सयेथे क्लिक करा

CBSE 10th Class New Exam Pattern Details in Marathi

CBSE Class 10th Exam
CBSE Class 10th Exam

10वी च्या परीक्षेमद्धे ज्या उमेदवारांना कमी मार्क्स मिळतात त्यांना या नवीन पॅटर्न चा खूप फायदा होणार आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने (सीबीएसई) आता विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सीबीएसईची दहावीची परीक्षा 2026 पासून वर्षातून दोन वेळा होणार आहे.

यामधील पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होणार असून दुसरी मे महिन्यात होईल. आणि जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनाच दुसऱ्या परीक्षेला बसता येणार आहे. फेब्रुवारीत होणारी परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असले, तरी मे महिन्यात होणारी दुसरी परीक्षा देण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर नसेल. विशेष म्हणजे पहिल्या परीक्षेत एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करू शकणार आहेत. CBSE Class 10th Exam Pattern News

ही माहिती वाचा : SSC CGL Selection Process: पहा निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व पूर्ण माहिती

बुधवारी सीबीएसईने याबद्दलचे पत्रक जाहीर करत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. कारण या अगोदर याबद्दल बातमी समोर आली होती. या परीक्षेच्या तपशीलांबद्दलही या पत्रकात माहिती देण्यात आली आहे. त्यात परीक्षा घेण्याचा काळ, परीक्षेबाबतचे नियम, विषयांची निवड, आदी गोष्टींचा समावेश आहे.

CBSE 10th 1st Exam 17 फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. आणि या परीक्षेचा निकाल 20 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे अनिवार्य असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच 05 मे 2026 रोजी होणारी दुसरी परीक्षा देता येईल. ही परीक्षा दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुण सुधारण्याची संधी असेल.

आणि मे महिन्यामध्ये होणाऱ्या या परीक्षेमद्धे विद्यार्थी जास्तीत जास्त विषयांची निवड करू शकणार आहेत. मात्र फेब्रुवारी महिन्यातील परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीचे वर्ष पुन्हा द्यावे लागेल.

CBSC 10th Exam 2 Times

नेमके कोणते मार्क्स ग्राह्य धरले जाणार? : आता महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडला असेल की या होणाऱ्या दोन्ही परीक्षेमधून कोणते मार्क्स ग्राह्य धरले जाणार आहेत. तर पहिल्या किंवा दुसऱ्या परीक्षेपैकी विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील, त्या परीक्षेचे गुणच ग्राह्य धरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर तेच गुण नोंदवले जातील.

20 एप्रिल रोजी पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत शाळांना या पुढील परीक्षेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणे बंधनकारक असेल. या यादीत विद्यार्थ्याचे नाव नसेल, तर त्याला ही दुसरी परीक्षा देता येणार नाही. तसेच या दुसऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रही आवश्यक आहे. CBSE Class 10th Exam

CBSE Class 10th Exam ची ही माहिती शेअर करा तुमच्या इतर मित्रांना जे 10वी च्या वर्गामद्धे आहेत. जेणेकरून त्यांना याबद्दल माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या नोकरी मार्ग वेबसाइट ला भेट देत जा.

पहा महत्वाची अपडेट :