ITI Admission 2nd Merit List: महाराष्ट्रातील आयटीआय प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; मिळणार 49 हजार विद्यार्थ्यांना संधी

ITI Admission 2nd Merit List

मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल जरा जास्तच आहे. आता आयटीआय प्रवेशाची दुसरी यादी (ITI Admission 2nd Merit List) जाहीर झाली आहे. यामध्ये 39 हजार 340 विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर पहिल्या यादीमध्ये 82833 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 211 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता.

मित्रांनो पुढे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच अपडेट साठी आपल्या टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Maharashtra iti admission second merit list 2025

या लागलेल्या दुसऱ्या आयटीआय प्रवेशाच्या यादीमध्ये 49 हजार 340 विद्यार्थ्यांची नावे आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे यामधील किती विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेतात याकडे लक्ष आहे. आयटीआयच्या पहिल्या यादीत 82 हजार 833 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळाली होती पण या यादीमधील निम्म्याहून थोडे जास्त म्हणजेच 42 हजार 211 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश घेतलेला आहे.

ही प्रवेश प्रक्रिया राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीव्हीईटी) दरवर्षी आयटीआय अभ्यासक्रमांसाठी राबवली जाते. राज्यामध्ये एकूण 992 आयटीआय संस्था आहेत. आणि या संस्थांमध्ये एकूण एक लाख 46 हजार 820 जागा उपलब्ध आहेत. यात सरकारी संस्थांमधील 94 हजार 296 जागांचा आणि खासगी संस्थांमधील 52 हजार 524 जागांचा समावेश आहे.

राज्यभरातून एक लाख 73 हजार 673 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. या लागलेल्या दुसऱ्या यादीमध्ये विभागानुसार विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही पुढे पाहू शकता.

second list of iti admission maharashtra
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Naukrimarg.com ला रोज भेट देत जा.